सोलापूर; बियर शॉपीसाठी पैसे आण म्हणून विवाहितेचा छळ

 सोलापूर : बियर शॉपीसाठी पैसे आण म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. शिल्पा आनंद मड्डी (रा. प्रियदर्शन नगर, जुने विडी घरकुल) यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती.


दरम्यान, तीन वर्षांपूर्वी शिल्पा यांचा आनंद वसंत मड्डी याच्यासोबत विवाह झाला होता. सासरच्यांनी वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला. माहेरून लॅपटॉप, मोबाईल, नवीन गाडी आण म्हणून तगादा लावला. त्यासाठी नकार दिल्याने त्यांनी शिवीगाळ केली. तसेच नवीन बियर शॉपी सुरू करायला माहेरून पैसे आण म्हणूनही छळ केला. त्यानंतर बंगळूर येथे नवीन घर घ्यायचे आहे, त्यासाठी पैसे आण म्हणून त्रास दिला.


पैसे आण म्हणून छळ करीत जीवे मारण्याची धमकी देखील त्यांनी दिली. शिवराज कस्सा याने 'तू खूप सुंदर आहेस, मला खूप आवडतेस' म्हणून द्वेषभावना निर्माण केली. पतीचे कान भरून छळ करायला लावला, असेही फिर्यादीत नमूद आहे. त्यावरून पती आनंद मड्डी याच्यासह विजयालक्ष्मी वसंत मड्डी, वसंत रामचंद्र मड्डी (तिघेही रा. योगेश्वर नगर, जूने विडी घरकुल) आणि प्रीती शिवराज कस्सा व शिवराज कस्सा (दोघेही रा. गणेश पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक चव्हाण तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments