नाल्यात आढळला महिलेचा मृतदेह , हात- पाय बांधलेले असल्याने हत्येचा संशय

 मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील  कुर्ला पूर्व येथील बंटर भवन परिसरात एका नाल्यात महिलेचा मृतदेह आढळला आहे.


मृतदेह एक गोणीत भरलेला होता आणि त्या महिलेचे हात-पाय दोरीने बांधलेले होते. काल, बुधवारी सकाळी एका वाटसरुला हा मृतदेह दिसल्याने त्याने तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. 

महिलेचे हात पाय दोरीने बांधलेले आढळल्याने त्या महिलेचा खून करून तिचा मृतदेह नाल्याजवळ फेकून दिल्याचा संशय पोलिसांना आहे.


नेहरूनगर पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने माहीती दिली की, "जवळपास 25 वर्षे वयाच्या महिलेचे हात आणि पाय दोरीने बांधलेले होते, ज्यामुळे संशय येतो की नाल्यात टाकण्यापूर्वी तिची हत्या करण्यात आली होती." हा मृतदेह आधी एका वाटसरूला दिसला आणि नंतर त्याने स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मृत महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे


Post a Comment

0 Comments