अमेरिकेच्या कॅलिफोर्निया इथं पंजाबच्या ज्या कुटुंबाचं अपहरण झालं होतं त्या ४ सदस्यांचा मृतदेह सापडल्यानं खळबळ माजली आहे. या मृतांमध्ये ८ महिन्याच्या मुलीचाही समावेश आहे.

या प्रकरणी कॅलिफोर्निया पोलिसांनी ४८ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले होते. या व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे. अद्यापही अपहरण केलेल्या लोकांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. मर्स्ड काउंटीच्या एटीएममध्ये पीडित कुटुंबाच्या बँक कार्डचा वापर झाल्याचं समोर आले. अधिकाऱ्यांनी चौकशी करून तिथे गेले असता अपहरण कर्त्यांनी पुरावे मिटवण्यासाठी ट्रकाला आग लावल्याचं दिसून आले.



0 Comments