अस्वलाचा नाद केला , थोबाड फोडून टाकलं ! तीन जणांवर जीवघेणा हल्ला

 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं आता नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामध्ये त्या अस्वलानं जीवघेणा हल्ला करुन तीन जणांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत केली आहे 


नेटकऱ्यांनी तो व्हिडिओ पाहताच अनेकांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. 


आता वनप्रशासनाकडून तातडीनं कार्यवाही केली जावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


तामिळनाडूच्या एका जंगलातील तो व्हिडिओ असून त्या अस्वलानं तीन जणांवर हल्ला केला आहे. त्या तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. 


तिघेजण आपल्या वाहनावरुन जवळच्या गावात मसाल्याची पाकिटं विकण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी अस्वलानं त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात आले आहे.

वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जेव्हा त्या व्यक्ती जंगल ओलांडून दुसरीकडे जाण्याच्या तयारीत होते तेव्हा एका अस्वलानं त्यांच्यावर हल्ला केला. 


झाडीतून ते अचानक आले आणि त्यानं त्या व्यक्तीवर हल्ला केला. त्या माणसाच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत करत तो चेहरा पूर्णत ओरबाडून टाकला. असं म्हटलं जातंय की, लोकांनी अस्वलाला पळवून लावण्यासाठी त्याच्यावर दगडफेक केली होती. त्यामुळे ते अस्वल चिडले होते.


Post a Comment

0 Comments