सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील माडग्याळ व व्हसपेठ हद्दीतील शेतातील घरात जन्मदात्या आईचा मुलानेच दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना रविवारी दुपारी घडली.
जन्मदात्या आईचा दगडाने ठेचून खून केल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. या प्रकाराने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शांताबाई अण्णाप्पा कोरे (वय 55) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे, तर खून करणारा नराधम हा सुरेश आण्णाप्पा कोरे (वय 37) हा शांताबाई यांचा एकुलता एक मुलगा आहे. रविवारी दुपारी दुपारी धक्कादायक प्रकार घडला.
खून झालेल्या शांताबाई यांचा सुरेश हा एकुलता एक मुलगा आहे, पतीचे निधन झाले आहे.
ते दोघेच शेतातील घरामध्ये राहत होते. रविवारी दुपारी शेतामध्ये आई व मुलगा यांच्यात वादावादी झाली. या वादातून आईच्या डोक्यात दगड घालून व दगडाने ठेचून खून केला.






0 Comments