रामदास पोपट तांबे (वय 30, रा. भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी पोलीस नाईक लक्ष्मण डामसे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
चंद्रमा सीमांचल मुनी (वय 28, रा. ओरिसा) असे बेपत्ता तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रमा हिने तिच्या वडिलांच्या नावावर असलेल्या दोन घरांपैकी एक घर तिच्या नावावर करून द्यावे, तसेच पैसे आणि दागिनेही द्यावे अशी मागणी केली.
त्यासाठी तिने आरोपीच्या नावाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. आरोपीला ते पटत नसल्याने त्यांच्यात वाद वाढले.
जर आरोपीने तिला साथ दिली नाही, तर ती त्याला लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवणार, अशी धमकी तिने दिली.
तिच्यापासून कायमची सुटका करून घेण्यासाठी त्याने तरुणीला जीवे मारण्याच्या उद्देशाने भोसरीमधून केळगाव येथे नेले. तिथे नदी पात्रात तिची विल्हेवाट लावली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
0 Comments