पंढरपूर सिंहगड मध्ये "रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स" या विषयावर व्याख्यान

पंढरपूर: प्रतिनिधी

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालय कोर्टी (ता.पंढरपूर) येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात "रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 


हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी यांनी दिली. 


    मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात "रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स" या विषयावर पुणे येथील प्रा. भाग्यश्री शेंडेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.


 या व्याख्यानाची सुरुवात सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. दरम्यान प्रा. भाग्यश्री शेंडेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 


मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी "रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स" या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.

 यामध्ये प्रा. भाग्यश्री शेंडेकर यांनी लाॅजिक इन, मशीन्स, रोबोटिक्स, प्रोग्रॅमिंग लिस्ट पाथ, फायंडीग अशा विविध विषयांवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.


  या व्याख्यानाचे सुञसंचलन व आभार प्रदर्शन प्रा. धनंजय गिराम यांनी केले. हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments