मंगळवेढा तालुक्यात कारमधून दोन लाखांची गोवा मेड दारू जप्त

 

राज्य उत्पादन शुल्क विभागाने 25 नोव्हेंबर रोजी मंगळवेढा तालुक्यात माचणूर गावच्या हद्दीत एका ह्यूंडाई आय20 कारमधून गोवा राज्यनिर्मित 30 पेटय़ा विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे.

कारवाईत वाहनासह पाच लाख 76 हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.लक्ष्मीप्रसाद सखाराम मांजरेकर (रा. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.


सांगोला-मंगळवेढा रस्त्यावरून एका कारमधून गोवा मेड दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क किभागाचे निरीक्षक संदीप कदम यांना मिळाली होती.


 त्यानुसार त्यांनी 25 नोक्हेंबर शुक्रवारी पहाटे 6 वाजेच्या सुमारास सांगोला-मंगळवेढा रोडवरील माचणूर गावच्या हद्दीत सापळा रचला. 


काही वेळाने आलेल्या ह्यूंडाई आय ट्केंटी कारला थांबवून तपासणी केली असता, त्यात गोवा राज्यनिर्मित व गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या विदेशी दारूचा साठा दिसून आला. वाहनचालक लक्ष्मीप्रसाद मांजरेकर यांना ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


 या कारवाईत इंपिरियल ब्लू या विदेशी ब्रँडच्या 180 मिली क्षमतेच्या 1440 सीलबंद बाटल्या जप्त केल्या असून, त्याची किंमत दोन लाख 16 हजार आहे. वाहनासह एकूण पाच लाख 76 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.


अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस विभाग निरीक्षक संदिप कदम, सांगोला दुय्यम निरीक्षक कैलास छत्रे, जवान तानाजी काळे, तानाजी जाधव व वाहनचालक संजय नवले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


Post a Comment

0 Comments