सोलापूर : अभियांत्रिकेचे शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळत नसल्याने निराश झालेल्या एका २३ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली.
घटना कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील आसाराम बापू मठाच्या पाठीमागील विहिरीत शुक्रवारी दुपारी उघडकीस आली.
ईश्वर रमेश गुंटूरक ( वय २३ रा. जुने विडी घरकुल, अ विभाग) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
बुधवारी दुपारी घरातून गेला होता. याची माहिती मिळाल्यानंतर वळसंगचे पोलीस आणि अग्निशामकच्या पथकाने संबंधित विहिरीतील पाण्यात शोध घेतला.
पाणी जास्त असल्याने मृतदेह आढळून आला नव्हता. शुक्रवारी त्याचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला.
मयत ईश्वर गुंटूर याचे शिक्षण बी.ई. झालेले आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.
त्याचे वडील लुम कारखान्यात जॉबर म्हणून काम करतात. घटनेची नोंद वळसंग पोलिसात झाली. सहाय्यक फौजदार दासरी पुढील तपास करीत आहेत.
0 Comments