प्रेमाला विरोध करणाऱ्या आई-वडिलांचा खून मुलीनं तिच्या दोन प्रियकरांच्या मदतीनं केल्याचा धक्कादायक प्रकार कानपूरच्या बर्रा भागातल्या ईडब्ल्यूएस कॉलनीत घडला आहे.
संबंधित मुलीनं तिच्या भावालादेखील ज्यूसमध्ये विष घालून मारण्याचा प्रयत्न केला; पण सुदैवाने तिचा भाऊ वाचला. ही घटना 5 जुलै 2022 रोजी घडलेली असून, तपासातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. 5 जुलै 2022 रोजी कानपूरच्या बर्रा भागातल्या ईडब्ल्यूएस कॉलनीतील एका घराबाहेर सकाळीच लोकांची गर्दी जमली होती. काही वेळानं पोलिसही तेथे आले.
पोलिसांनी जेव्हा घरात प्रवेश केला, तेव्हा समोर दोन जणांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचं पोलिसांना दिसलं. मुन्नालाल (वय 61) व त्यांची पत्नी राजदेवी (वय 55) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं होती. ही दोघं मुलगी कोमल आणि मुलगा अनूपसोबत त्या घरात राहत होती. या दुहेरी हत्याकांडाने सर्वांनाच गोंधळात टाकलं.
निवृत्त ऑर्डिनन्स कर्मचारी मुन्नालाल आणि त्यांची पत्नी राजदेवी हे दोघेही मुलगी कोमलच्या लग्नाच्या तयारीत व्यग्र होते. त्यांचा मुलगा अनूपचा त्याच्या पत्नीशी वाद सुरू होता. ती लग्नानंतर लगेचच सासर सोडून माहेरी गेली होती; पण कोमलचं लग्न होण्यापूर्वीच मुन्नालाल व राजदेवी या दोघांची हत्या झाली. त्यामुळे या परिवारासह संपूर्ण परिसर हादरला होता.
या गुन्ह्याचा पोलिसांनी तपास केल्यानंतर या दोघांच्या खुनाचा कट त्यांची मुलगी कोमल हिनेच रचल्याचं समोर आले व सर्वांनाच धक्का बसला. मध्यरात्री आई-वडिलांचा गळा चिरून खून झाल्याचं मयत दाम्पत्याचा मुलगा अनूप याने पोलिसांना सांगितलं होतं. त्याने सांगितलं होतं, की घटनेच्या दिवशी तो पहिल्या मजल्यावरच्या रूममध्ये झोपला होता. त्याचे आई-वडील आणि बहीण तळमजल्यावरच्या रूममध्ये झोपले होते.
वडील बाहेरच्या रूममध्ये होते, तर आई आणि बहीण आतल्या रूममध्ये झोपले होते. पहाटे बहीण कोमलने त्याला येऊन उठवलं आणि आई-वडिलांचा कोणी तरी खून केल्याचं सांगितलं. अनूपने आणखी एक महत्त्वाची गोष्ट पोलिसांना सांगितली. तो म्हणाला, 'घटना घडली त्या रात्री मला चक्कर येत होती, आणि माझ्या जेवणात कोणी तरी काही तरी मिसळले असल्यासारखं वाटत होतं.' आश्चर्याची बाब म्हणजे घटनेच्या दिवशी त्यांच्या घरात बाहेरून कोणीही आले नव्हते.
त्यामुळे अनूपच्या जबाबावरून दोन प्रश्न उपस्थित झाले. पहिला म्हणजे, खुनापूर्वी घरात बाहेरून कोणीही आले नव्हते. मग त्यांच्या जेवणात अंमली पदार्थ कोणी मिसळला? आणि दुसरा म्हणजे, त्याची बहीण त्याच्या आईसोबत झोपली होती, तेव्हा तिला त्याच्या आईवर झालेल्या हल्ल्याची माहिती का मिळाली नाही?
हाच धागा पकडून पोलिसांनी तपास केला आणि धक्कादायक सत्य पुढे आलं.अनूपचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी कोमलचा जबाब घेतला. पोलिसांना कोमलनेही जवळपास तीच गोष्ट सांगितली जी तिचा भाऊ सांगत होता. म्हणजेच मध्यरात्री मारेकरी घरात घुसले आणि आई-वडिलांची हत्या करून निघून गेले.
तिला जाग येईपर्यंत मारेकरी तेथून निघून गेले होते; मात्र कोमलने एक नवीन गोष्ट सांगितली, की तिने तीन बुरखाधारी व्यक्तींना घरातून पळताना पाहिलं होतं. त्यात तिचा भाऊ अनूपचा लहान मेहुणा मयंक गुप्तादेखील होता.
0 Comments