बीअरचा नादखुळा, माकडाला लागलं दारूचं व्यसन

 

दारूच्या व्यसनापोटी माणूस माकडासारखा विचित्र वागू लागल्याचे आपणही पाहिले असेल. 


पण हा दारूचा नाद प्राण्यांनाही सोडत नाही बरं! अलीकडेच सोशल मीडियावर एका दारुड्या माकडाचा व्हिडीओ शेअर झाला होता, अवघ्या काहीच तासात हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.


ट्विटरवर ट्रेंडिंग या व्हिडिओमध्ये चक्क एक माकड किंगफिशर बिअरचे कॅन तोंडाला लावून गटागटा दारूचे घोट घेत असल्याचे दिसत आहे.

 या माकडाच्या व्यसनामुळे परिसरातील दारू विक्रेतेही हैराण झाले आहेत. नेमका हा प्रकार काय आहे? चला तर पाहुयात..


तर झालं असं की, उत्तर प्रदेशातील रायबरेलीतील एका बेवड्या माकडाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या माकडाने दारूच्या व्यसनामुळे अक्षरशः उच्छाद मांडला आहे. 

दुकानातून तर हा माकड दारु चोरून पितच होता मात्र आता तर लोकांच्या हातातूनही त्याने बिअरचे कॅन चोरून प्यायला सुरुवात केली आहे. 


या मद्यपी माकडाविरुद्ध आता दुकानदारांनी पोलिंसाकडे धाव घेतली आहे. प्राप्त माहितीनुसार, श्याम सुंदर या वाईन स्टोअरमधील विक्रेत्याने वानराला पळवून लावण्यासाठी वनविभागाकडे मदत मागितली आहे.

Post a Comment

0 Comments