किरकोळ कारणावरून व्यावसायिकावर वार

 

सनी ज्ञानू शिरसाठ (वय 37 रा.पिंपरी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी सद्दाम,सोहेल याना पोलिसांनी अटक केली


 असून कपाळ्या उर्फ आकाश काळे, बाळ्या उर्फ विजय काळे, इरफान शेख व त्याचे साथीदार यांच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्याा माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी शेख व बाबा रणदिवे यांचे पुर्वी भांडण झाले होते. 

बाबा रणदिवे हा कोरोनाकाळत मयत झाला. त्यानंतर एका कार्यक्रमात फिर्यादी यांनी रणदिवे याबद्दल बोलताना तो मेला गेला खड्यात असे बोलले.


ही गोष्टी शेख ला समजताच शेख व त्याचे साथीदार यांनी 3 ऑक्टोबर रोजी फिर्यादी यांना गाठून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कोयत्याने डोक्यावर व पाठीवर वार करत गंभीर जखमी केले. 


तसेच परिसरात कोयते नाचवून दहशत पसरवली.यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments