देशाच्या सीमेवरील असेही एक गाव , येथे महिला करतात चार विवाह

 

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. या निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य प्रचारसभा, घाेषणांनी दुमदुमले हाेते.


मात्र, या राज्यात एक गाव या काेलाहलापासून लांब हाेते. हे गाव एका अर्थाने खूप वेगळे आहे. 


या गावातील महिला दाेन किंवा दाेनपेक्षा जास्त पुरुषांसाेबत विवाह करते. सर्व पतींसाेबत महिला एकाच घरात राहते. 


अशाप्रकारची परंपरा असलेल्या या गावाचे नाव आहे छितकुल. महाभारतामुळे गावात ही परंपरा सुरू झाल्याचे सांगण्यात येते.


 छितकुल हे दिल्लीपासून सुमारे ६०२ किलाेमीटर अंतरावर आहे. गाव अतिशय दुर्गम भागात आहे. हिवाळा सुरू हाेताच तेथे बर्फवृष्टी हाेते आणि आजूबाजूचा परिसर एका 


वेगळ्याच साैंदर्याने नटून जाताे. चीन-तिबेट सीमेला लागून असलेले छितकुल हेया भागात भारताचे अखेरचे गाव आहे. तेथे ४७१ मतदार आहेत. प्रत्यक्ष ताबा रेषा तेथून ६० किलोमीटर अंतरावर आहे.


Post a Comment

0 Comments