फर्निचरच्या दुकानाला आग, 10 लाखांचे नुकसान

 

लातूर  शहरातील सारोळा रोड परिसरात असलेल्या एका लाकडी अड्ड्याला शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली

आगीमध्ये  फर्निचरसह दारे-खिडक्या आणि इतर साहित्य असा जवळपास दहा लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे.


 याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात दुकानदाराने तक्रार दिली आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.


लातूर शहरातील विवेकानंद चौक परिसरात असलेल्या सरोळा रोडवर माजिद बशीरसाब शेख यांचे दारे- खिडक्या तयार करण्याचे दुकान आहे. ते नेहमीप्रमाणे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घराकडे गेले होते.


दरम्यान, दुकानाशेजारी राहणारे पांढरे यांचा पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास फोन आला. तुमच्या दुकानाला आग लागली आहे. तातडीने दुकानाकडे या, असा त्यांनी निरोप दिला. 


फोन ठेवताच दुकान मालकाने दुकानाकडे धाव घेतली. याबाबत अग्निशमन दलाच्या केंद्राला फोन करून माहिती दिली.

शिवाय, विवेकानंद चौक पोलीस ठाणे गाठून पोलिसांनाही माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, या आगीत तयार


 करण्यात आलेले ७० दार, १५० च्यावर खिडक्या आणि त्यासाठी लागणारे इतर साहित्य असा जवळपास ९ ते १० लाखांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्यापही समोर आले नाही. घटनास्थळी विवेकानंद चौक ठाण्याच्या पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

Post a Comment

0 Comments