मॉर्निग वॉकसाठी निघालेल्या 62 वर्षीय महिलेचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यु

मागील काही दिवसांमध्ये मुंबईतील 2 जणांनी लिफ्टमुळे आपला जीव गमावला आहे. 


मुंबईतील मानखुर्द परिसरात 28 ऑक्टोबर रोजी लपाछपी खेळत असलेल्या एका तरुणीच्या डोक्यावर लिफ्ट पडून तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.


 ही घटना ताजी असतानाच मुंबईतील कांदिवली पश्चिम चारकोप परिसरात निवासी इमारतीत लिफ्ट कोसळून एका 62 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.


एका पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. मॉर्निंग वॉकसाठी महिला लिफ्टमधून चौथ्या मजल्यावरून खाली जात असताना 21 ऑक्टोबर रोजी चारकोप परिसरातील एका बहुमजली इमारतीत ही घटना घडली असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

 चारकोप पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला लिफ्टमध्ये उतरताच ती तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या मध्येच अडकली. 


महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केला आणि जेव्हा तिच्या मुलाने लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला विजेचा धक्का बसला, त्यामुळे वीजपुरवठा देखील खंडित झाला.

Post a Comment

0 Comments