मित्राशी लग्नास नकार दिल्याने तरुणीवर कोयत्याने वार

 

मित्राला लग्नास नकार देणाऱ्या तरुणीवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना पुण्याच्या मावळमध्ये घडली आहे.


 यात तरुणी गंभीर जखमी झाली असून मानेवर, हातावर आणि कानाच्या जवळ कोयत्याने वार करण्यात आले आहेत.


प्रकरणी सुनील उर्फ डुब्या रामदास ढोरे (वय २२) आणि अद्वैत उर्फ श्री भरत जाधव (वय २३) यांना कामशेत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.


 हल्ला करणारा मुख्य आरोपी सूर्यकांत उर्फ शाहीर पवार हा फरार आहे.


 त्याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना चार नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments