सोलापूर 27 नोव्हेंबर (हिं.स) गोवानिर्मित विदेशी दारूचे ३० बॉक्स चारचाकी कारमधून वाहतूक करणाऱ्या तरुणाला
राज्य उत्पादन शुल्क विभागाने माचणूरजवळ (सांगोला-मंगळवेढा रोड) पकडले.
पहाटेच्या सुमारास विभागाचे निरीक्षक संदीप कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती. मुंबई पासिंग असलेल्या एका कारमधून गोवा राज्य निर्मित विदेशी दारूचे बॉक्स नेले जात असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक कदम यांच्या पथकाने पहाटे पाच-साडेपाचच्या सुमारास माचणूर गावाच्या हद्दीत सापळा रचला.
काहीवेळाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला समोरून एक कार (एमएच ०२, सीएल ०८११) येताना दिसली.
0 Comments