मंगळवेढा: टर्न घेताना धडक , तीन जखमी एकाविरुद्ध गुन्हा दाखल

 

मंगळवेढा शहरानजीक बायपास रोडवर टर्न घेताना वॅगनोर गाडीने इर्टिका गाडीला जोराची धडक दिल्याने यामध्ये अंकोली येथील


तीघेजण गंभीर जखमी झाले असून निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी धुळदेव जगन्नाथ अनुसे (रा.मंगळवेढा) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.


पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी अजिंक्य अशोक क्षीरसागर (रा.अंकोली) हे दि.24 रोजी त्यांच्या मामाच्या मुलीचा माळशिरस येथे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असल्याने ते गेले होते.


कार्यक्रम आटोपून अंकोलीकडे परतत असताना मंगळवेढा शहरानजीक बायपास रोडवर सायंकाळी 6.10 वा.आरोपी धुळदेव अनुसे याने


त्याच्या ताब्यातील वॅगनोर एम एच 13 सी एस 7819 ही निष्काळजीपणे चालवून टर्न घेताना इर्टिका गाडीला जोराची धडक दिल्याने

यामध्ये रत्नप्रभा संजय क्षीरसागर (वय 45), मिरादेवी रमेश क्षीरसागर (वय 55) व फिर्यादी असे तीघेजण


यामध्ये गंभीर जखमी होवून दोन्ही गाडीची मोडतोड होवून नुकसान झाल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.


Post a Comment

0 Comments