दुचाकी दुभाजकावर आदळल्यानंतर दोघे मित्र रस्त्यावर फेकले गेले , तितक्यात....

 

जळगावात अपघाताचे प्रमाण वाढताना दिसतेय. अशातच जळगावात झालेल्या अपघातात दोन मित्रांना आपला जीव गमवावा लागलाय. भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून दोन मित्र चारचाकी वाहनाच्या खाली येवून ठार झाल्याची दुर्देवी घटना जळगाव शहरातील गुजराल पेट्रोल पंपाजवळील उड्डाणपूलावर घडलीय.


घटना २४ डिसेंबर रोजी घडलीय.

मयूर विठ्ठल लंके-साळूंखे (१९, रा. पथराड, ता. धरणगाव) व दीपक समाधान पाटील (२१, रा. बोरखेडा, ता. धरणगाव) असे अपघातातील मृतांची नावे आहेत. जळगावातील मित्राला भेटून मयूर आणि दीपक हे शनिवारी 24 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घराकडे सुसाट निघाले होते. 


गुजराल पेट्रोल पंपाजवळील उड्डाणपूलावर अचानक दुभाजकावर दुचाकी आदळल्यानंतर दोघे रस्त्याच्या दुस-या बाजूच्या रस्त्यावर फेकले गेले आणि दुस-याच क्षणी ते चारचाकी वाहनाच्या चाकाखाली आले.


यात मयूर याचा जागीच मृत्यू झाला तर दीपक याचा खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दुपारी जिल्हा सामान्य रूग्णालयात नातेवाईकांसह ग्रामस्थांची प्रचंड गर्दी झाली होती.


Post a Comment

0 Comments