असं म्हणतात प्रेम आंधळं असतं, प्रेमात असलेला माणूस स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही. पण एकवेळ तुम्हाला स्वतःच्या जीवाची पर्वा नसेल तरी इतरांचा जीव महत्त्वाचा आहे हे विसरता कामा नये.
प्राप्त माहितीनुसार व्हायरल होणारा व्हिडीओ हा भिवंडी येथील एका बाइक स्टंटचा आहे. व्हिडिओमध्ये बुरखा घातलेली एक मुलगी मागे बसण्याऐवजी दुचाकीस्वाराच्या समोर बसलेली दिसत आहे आणि दुचाकीस्वार हायवेवर धावणाऱ्या इतर वाहनांना ओव्हरटेक करताना पुढे जात आहे. पाठीमागून धावणाऱ्या दुचाकीवर बसलेल्या तरुणाने त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला.
या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, जेव्हा शूट होत असल्याचे पाहून स्टंट करणारा दुचाकीस्वार थांबतो आणि व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाला धमकावतो. दुचाकीस्वार आणि तरुणीवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. समोर आलेल्या घटनेच्या व्हिडिओमध्ये मुलगा पल्सर बाइक चालवत आहे. झुबेर शब्बीर मोमीन असे त्याचे नाव असल्याचे समजतेय.
दरम्यान, हा व्हिडीओ पाहून या जोडप्याचं प्रेम नव्हे तर मूर्खपणाच दिसून येत असल्याचं अनेकांनी म्हंटल आहे. आपली चूक असूनही ज्या पद्धतीने या व्हिडिओतील तरुण त्या शूटिंग करणाऱ्या तरुणावर भडकला आहे यावरून तरी त्याला आपलं काही चुकल्याची जाणीव नसावी असं दिसतंय. आपण हा व्हिडीओ पाहून असा पराक्रम करण्याचा विचारही करू नका




0 Comments