अडीच लाखांच्या गांजासह एकास अटक ; दुसरा पसार

 

शहरात बसस्थानकाजवळ विक्रीसाठी आणलेला दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा १५ किलो गांजा अमळनेर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून पकडला असून, त्यात एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक जण फरार होण्यात यशस्वी झाला आहे.


अमळनेर बसस्थानकाजवळ गुरुवारी (ता. २२) रात्री बाराच्या सुमारास दोन जण गांजा आणणार असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली होती.


त्या नुसार बसस्थानक परिसरात राधेश्याम रामसिंग पावरा व सुरेश साहेबराव भदाणे (दोन्ही रा. हिसाळे, ता.शिरपूर, जि. धुळे) हे एका पिशवीत सुमारे दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा १५ किलो ५६६ ग्रॅम गांजासोबत पोलिसांना आढळून आले. 

सुरेश भदाणे यास पोलिसांची चाहूल लागताच तो त्या ठिकाणाहून पळून जाण्यास यशस्वी झाला. तर राधेश्याम पावरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सहाय्यक फौजदार राजेंद्र कोठावदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विजय शिंदे तपास करीत आहेत. या प्रकरणी संशयितास शुक्रवारी (ता. २३) अमळनेर न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


दरम्यान, ही कारवाई पोलिस निरीक्षक विजय शिंदे, सहाय्यक फौजदार राजेंद्र कोठावदे, पोलिस कर्मचचारी किशोर पाटील, दीपक माळी, रवींद्र पाटील, मिलिंद भामरे, सूर्यकांत साळुंखे, सिद्धांत शिसोदे, हर्षल पाटील, विलास बागूल आदींनी केली. या वेळी मुडी तलाठी प्रदीप भदाणे, नीलेश पवार, सागर पाटील, रोहन आठवले आदी पंच म्हणून उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments