नांदण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीवर केला चाकू हल्ला

 

नांदण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीवर चाकू हल्ला केल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


प्रकरणी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो पसार झाला आहे. याबाबत 27 वर्षीय पत्नीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


 तक्रारदार महिलेचा पती सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्‍यातील आहे. तो एचआयव्ही बाधित आहे. त्यामुळे पत्नी त्याच्यापासून विभक्त राहत आहेत. बिबवेवाडीतील सुखासागरनगर भागात ती राहायला आहे.


पतीने पत्नीला नांदण्यासाठी आग्रह धरला होता. पत्नीने नांदण्यास नकार दिल्याने तो चिडला होता. बिबवेवाडीतील हिरामण बनकर शाळेजवळ पतीने पत्नीवर चाकुने वार केले. पसार झालेल्या पतीचा शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक छाया गादिलवाड तपास करत आहेत.


Post a Comment

0 Comments