पैशाच्या लोभातून हत्या...

 

सहकाऱ्याच्या बँक खात्यात आणि जवळ असलेली रक्क्म माहीत झाल्याने दारूच्या नशेत असल्याचा फायदा घेत लोखंडी रोडने डोक्यावर प्रहार करून खून केल्याची घटना मौदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.


कार्तिक सदाराम चंद्रवशी (वय २४) असे मृताचे नाव आहे. कार्तिक आणि आरोपी इंद्रकुमार कलेश्वर चंद्रवशी (वय १९, अडाम, डोंगरगांव छत्तीसगड) हे दोघेही घटनेच्या दिवशी मौदा शिवारात दारू पित बसले होते. 


कार्तिकच्या खिशात २० हजार आणि त्याच्या खात्यात ४४ हजार रुपये असल्याचे इंद्रकुमारच्या लक्षात आले.


कार्तिक दारूच्या नशेत असल्याचा फायदा घेत इंद्रकुमारने ट्रकमधील लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर वार करून संपविले. त्याच्या जवळ आणि खात्यात असलेली रक्कम एटीएमद्वारे काढल्याची कबुली त्याने पोलिस तपासात दिली.


Post a Comment

0 Comments