सोशल मीडियावर प्राण्यांचे रोज नवे व्हिडीओ पाहायला मिळतात, त्यापैकी काही व्हिडीओ लोकांना पाहायला अधिक आवडतात.
दोन साप एका ठिकाणी आहेत, त्याचवेळी तिथं एक साखळीने बांधलेलं माकडं आहे. हे माकडं दोन नागाच्या समोर अचानक उडी घेतं. त्यानंतर समोर असलेल्या सापाला चापट मारतो.
माकडं वारंवार मारत असल्याचं लक्षात आल्यानंतर साप फणा काढतो आणि फणा मारण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी माकडं पुन्हा त्याला पकडून ठेवतं. त्यानंतर दुसरा साप माकडाला फणा मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचं दिसत आहे.
एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार माकडाने दोन्ही सापांची चांगलीचं धुलाई केली आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. लोकांनी व्हिडीओच्या खाली अनेक कमेंट केल्या आहेत.




0 Comments