त्या चिमुकलीचं अपहरण नव्हे , तर जन्मदात्रीनेच ...., पोलिसही चक्रावले

 

पुणे: आळे येथील ग्रामीण रुग्णालयात नवजात मुलीला डोस देऊन घरी येत असताना अज्ञात इसमानं आईला धक्का देऊन तिच्या 15 दिवसापूर्वी जन्मलेल्या नवजात मुलीचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (4 फेब्रुवारी) अहमदनगर-कल्याण महामार्गावर घडली होती.


मात्र, या घटनेत वेगळीच माहिती समोर आली असून, जन्मदात्रीनेच तिच्या पोटच्या गोळ्याला संपवण्याचं कृत्य केलंय. 

15 दिवसाच्या बाळाचे अपहरण झाल्याच्या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं. स्वतः आईनेच आपल्या पोटच्या बाळाला पिंपळगाव जोगा डाव्या कालव्यात फेकल्याचं समोर आलं. मुलीच्या आईनेच पोलीस तपासात ही कुबली दिली.


आळेफाटा पोलीस शनिवारी दिवसभर बाळाच्या मृतदेहाचा शोध घेत होते. परप्रांतीय महिलेने फेकलेले बाळ तिचे पाचवे अपत्य होते. नवजात बालिकेला नकोशी करणाऱ्या जन्मदात्या आईला सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी ताब्यात घेतले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळेफाटा येथे वास्तव्यास असलेल्या एका परप्रांतीय महिलेने शुक्रवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास 15 दिवसापूर्वी जन्मलेल्या नवजात मुलीचे अपहरण झाल्याचं दाखवत महिलेनं आळेफाटा पोलीस ठाण्यात नवजात मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी घटनेनंतर २४ तासांत निर्दयी आईचे बिंग फोडले.

बाळाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवताना महिलेने सांगितलेल्या घटनाक्रमामुळे पोलिसांना महिलेवर संशय आला. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास सुरु केले असता, घडलेल्या घटनेपासून सीसीटीव्ही पोलिसांनी शुक्रवारी दिवसभर चेक केले. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी बालिकेच्या आईला ताब्यात घेत अधिक तपास केला. नवजात बाळाला पिंपळगाव जोगा डाव्या कालव्यात टाकल्याची कबुली आईने पोलिसांना दिली.


दरम्यान, पोलिसांकडून या महिलेची कसून चौकशी केली जात असून, पोटच्या बाळाला पिंपळगाव जोगा डाव्या कालव्यात टाकलेल्या बाळाच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. या महिलेने केलेल्या कृत्यामागे नेमके काय कारण आहे? याचा शोधही पोलिसांकडून घेतला जातो आहे.

पाचवी मुलगीच झाल्याने केले कृत्य?

या महिलेला पहिल्या तीन मुली, तर चौथा मुलगा आहे. वंशाला अजून एक दिवा हवा म्हणून या कुटुंबाने अजून एका अपत्याला जन्म दिला. पण पुन्हा मुलगीच झाल्याने या जन्मदात्या आईने या नवजात मुलीला पिंपळगाव जोगा डाव्या कालव्यात सोडून दिले असावे असा संशय आहे.

Post a Comment

0 Comments