सोलापूर: फटाका कारखाना स्फोटातील मुख्य आरोपी नाना पाटेकरला तामिळनाडूतुन अटक

 

बार्शी तालुक्यातील शिराळे पांगरीतील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात एकूण ५ महिलांचा मृत्यू झाला होता, तर ३ महिला जखमी झाल्या होत्या.त्यांवर उपचार सुरू आहेत.


याबाबत पांगरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी नाना पाटेकर याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.


तपासादरम्यान पथकाला आरोपी नाना पाटेकर हा तामिळनाडू येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्याला पोलिसांनी  तामिळनाडूतून अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तीनही संशयित आरोपी हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मुख्य संशयित आरोपी नाना पाटेकर हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. गुन्हा घडल्यापासून तो आपले अस्तित्व लपवून तामिळनाडूच्या  विविध जिल्ह्यात राहत होता.


सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी नाना पाटेकर याचा तपास सुरु केला. पोलिसांना असे निदर्षनास आले की, संशयीत आरोपी हा तामिळनाडू येथे पळून गेला. सोलापूर पोलिसांच्या पथकाने तामिळनाडू राज्यात जाऊन आरोपीची माहिती घेतली.

संशयीत आरोपी नाना पाटेकर याचा ठाव ठिकाणा प्राप्त केला. मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून संशयीत आरोपी नाना पाटेकर यास ताब्यात घेतले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Post a Comment

0 Comments