तरुणीचा प्रेमाला नकार, 23 वर्षीय तरूणाने स्टेटस ठेवलं अन्....

 

रायगड : आजपासून जगभरात प्रेमाचा आठवडा सुरू झाला आहे. लोक आपल्या भावना व्यक्त करताना पाहयला मिळत आहेत. अशातच रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सोलमकोंड एकतर्फी प्रेमातून धक्कादायक घटना घडली आहे.


एकतर्फी प्रेम प्रकरणातुन 23 वर्षीय तरुणाने आपलं जीवन संपवलं आहे. या घटनेमुळे सोलमकोंड गावात खळबळ माजली आहे.  एकतर्फी प्रेम प्रकरणातुन 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना महाड तालुक्यातील सोलम कोंड येथे घडली आहे. सतीश पवार असे मृत तरुणाचे नाव आहे.


त्याचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. तीने नकार दिल्याने सतीश दारूच्या आहारी गेला आणि नैराश्यातुन घरात नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेत त्याने आपले जीवन संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने जीवन संपवल्याचा स्टेटस ठेवला असल्याचे त्याच्या मित्र मंडळींकडुन सांगण्यात येत आहे. या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणी महाड MIDC पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. पोलीस अधिक तपास करीत आहेत. प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे.

ज्याच्यासाठी घरच्यांशी संघर्ष केला त्यानेच लग्नाला नकार दिल्याची सल मनात असल्याने त्या तरुणीने आत्महत्येचं पाऊल उचललं. आत्महत्या करण्यापूर्वी त्या तरुणीने चिठ्ठी लिहून ठेवली होती, त्यातून हे उघड झालं. एकाच महाविद्यालयात शिकत असताना एकमेकांना बघितलं आणि पहिल्या नजरेत प्रेम झालं. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.


महाविद्यालयातदेखील अनेकांना याची माहिती होती. लवकरच हे लग्न करतील, असाच अनेकांचा अंदाज होता. त्यांनी लग्नाच्या आणाभाकादेखील घेतल्या होत्या. मात्र त्यांच्या नात्याला कुणाची तरी नजर लागली अन् तरुणीने आपला जीव दिला. प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने उच्चशिक्षित तरुणी तणावात गेली अन् त्या तणावातून तरुणीने आत्महत्या केली. दीक्षा (वय 28) असे संबंधित तरुणीचे नाव आहे. शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.


Post a Comment

0 Comments