धक्कादायक: पतीने संपुर्ण कुटुंब संपवत केली आत्महत्या

 

कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या संपूर्ण कुटुंबाला संपवून स्वत: देखील आत्महत्या केली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा सांगवडेवाडी येथे ही घटना घडली आहे.


घटनेत व्यक्तीने त्याची पत्नी, मुलगी आणि मुलाची हत्या केली. सुदैवाने या घटनेत मुलगी बचावली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या कालव्यात ही घटना घडली.व्यक्तीने आपली पत्नी, मुलगी आणि मुलाला याच कालव्यात ढकलून दिलं आहे. या प्रकरणी संदीप अण्णासाहेब पाटील असे आरोपी वडलांचे नाव आहे. मुलीला शुद्ध आल्यावर काल रात्री उशिरा तिने दिलेल्या जबाबनुसार वडीलांवर खुन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कोल्हापूरमधील कागल पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील कालव्यात काल दुपारी राजश्री संदीप पाटील पत्नी, सन्मित संदीप पाटील मुलगा आणि श्रेया मुलगी यांना ढकलून देण्यात आलं होतं. तसेच स्वत:कर्नाटकात येथे जाऊन आत्महत्या केली.


पाण्यात पडल्याने पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला. मात्र मुलीला पोहता येत असल्याने ती बचावली आहे. पाण्यात अडकलेली असताना बचावासाठी मदत मागताना तिचा आवाज काहींना ऐकू आला. त्यावेळी त्यांनी तिला मदत करत कसबा सांगाव इथल्या प्राथमिकआरोग्य केंद्रात दाखल केले.दरम्यान, या घटनेत संदीप अण्णासाहेब पाटील यांनी एवढं टोकाचं पाऊल नेमकं का उचललं हे अद्याप समजलेलं नाही. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments