जत : तिकोंडी (ता.जत) येथे भर दिवसा राहत्या घराचे कुलूप तोडून सोने व रोख रक्कम चोरीस गेली आहे. या घरफोडीत अंदाजे सात ते आठ तोळे सोन्याची चोरी झाल्याचा अंदाज वर्तवला आहे.
उमदी पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार ,पोलीस नाईक आप्पासाहेब हाक्के यांच्या सह पोलीस दाखल झाले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगलीतून श्वानपथक व ठसेतज्ञ यांना पाचारण करण्यात आले. त्यांचे रात्री उशिरापर्यंत श्वानपथक घराजवळ घुटमळत होते. तसेच ठसे घेण्याचे काम सुरू होते.
याबाबत अधिक माहिती अशी, तिकोंडी पासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर जलिहाळ बुद्रक हद्दीलागत सिद्धांना हट्टी यांची शेतजमीन आहे. शुक्रवारी सकाळी त्यांचे कुटुंबीय शेतातील द्राक्षबागाच्या कामानिमित्त सर्वजण गेले होते शेतातील काम आटोपल्यानंतर साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हट्टी घरी आले यावेळी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत उमदी पोलिसांत माहिती दिली. पोलिसांनी ठसे यांना बोलवून ठसे घेण्याचे काम सुरू केले होते.




0 Comments