हृदयद्रावक; लग्नाच्या अक्षदा टाकण्याआधीच वधू पित्यासोबत घडलं भयानक

 

जळगाव: प्रत्येक पित्यासाठी आपल्या मुलीचे लग्न हा एक महत्त्वाचा विषय आहे. आणि प्रत्येक पितासुद्धा आपल्या आपल्या मुलीचे लग्न चांगल्या प्रकारे लावण्यासाठी प्रयत्नशील असतो.


तो या क्षणाची वाट पाहत असतो. मात्र, काहीवेळा काळ अचानक घाला घालतो आणि होत्याचं नव्हतं होतं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 


लग्नाच्या अक्षदा टाकण्याआधीच वधु पित्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. हृदयविकाराने मृत्यू या वधुपित्याचा मृत्यू झाला. जामनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक गावात ही हृदयद्रावक घटना घडली. 


लग्नाच्या अक्षदा टाकण्याआधीच वधु पित्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची हृदय द्रावक घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या मांडवे बुद्रुक गावात घडली आहे. या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ केली जात आहे. अरुण कासम तडवी, असे वधू पित्याचे नाव आहे. आपल्या मुलीच्या विवाह निमित्त हळदीच्या कार्यक्रमात नाचतांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने वधू पित्याचा मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे


Post a Comment

0 Comments