सातारा; म्हसवड पोलिस स्टेशन पासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या लोणार खडकी येथील शेतकरी कुंडलीक खांडेकर यांनी त्यांच्या मकवानाच्या पिकात तब्बल एक कोटी रूपये किमतीची गांजाची झाडे लावली होती.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, म्हसवडच्या एका शेतात गांजाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असल्याची माहिती अज्ञात खबऱ्यांकडून मिळाली होती.
सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने म्हसवड पोलीस स्टेशन पासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या लोणार खडकी या ठिकाणी मकवानाच्या शेत पिकात लावलेला तब्बल एक कोटी रुपये किमतीच्या गांजाची झाडे गुन्हे अन्वेषण विभागाने जप्त करून ती ताब्यात घेतली. सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती.




0 Comments