धक्कादायक: मंगळवेढा तालुक्यात एकाच कुटुंबातील तीन महिलांचा धारदार हत्याराने वार करुन खून

 

सोलापूर :  | सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात एकाच कुटुंबातील तीन महिलांचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे.


धक्कादायक घटनेमुळे तालुक्यात खळबळ उाडीली आहे. दरम्यान,  या घटनेप्रकरणी पोलिसांनी 30 वर्षीय संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे.


दीपाली बाळू माळी (वय 25), पारूबाई बाबाजी माळी (वय 45) आणि संगीता महादेव माळी (वय 50) अशी खून झालेल्या महिलांची नावे आहेत. या तिन्ही महिला त्यांच्या घरासमोरील अंगणात गंभीर अवस्थेत आढळून आल्या. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या नंदेश्वरमध्ये मंगळवारी (दि.21) दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
या महिलांवर धारदार हत्याराने वार करण्यात आले. एकाच घरातील तीन महिलांच्या हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे  यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.


या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवत 30 वर्षाच्या संशयित तरुणाला ताब्यात घेतले.
त्या तरुणामध्ये व एका महिलेमध्ये किरकोळ कारणावरुन भांडण झाले होते.
हे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या महिलेसह अन्य एका महिलेच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.


Post a Comment

0 Comments