पैठण : पिकअप चालकाला मारहाण करून हातपाय झाडाला बांधून अनोळखी दोन इसमांनी त्याला मारहाण केली. आणि त्याच्याकडून २ लाख २ हजारांचा मुद्देमाल लुटण्यात आला आहे.
पोलीसांच्या माहितीनूसार, गुरुवार (दि.८) रोजी रात्री अशोक लेलंड कंपनीचा पिकअप क्रमांक जीजे १६ ऐ व्ही ५८५९ या वाहनाचा चालक भिकूभाई अजितसिंग वाजा ( ता.भरुच ) हे प्रवास करत होते.
ते शाबू ट्रान्सपोर्ट पंढरपूर वाळूज एमआयडीसी औरंगाबाद येथून घरगुती सामान आणण्यासाठी गेवराई बार्शी- बोरगाव रोड वरून जात होते.
यावेळी दोन अनोळखी इसमांनी त्यांचा पिकअप थांबवला. त्यानंतर भिकूभाई यांना मारहाण केली. नायलॉन दोरीने हात पाय झाडाला बांधले. पिकअपसह हातातली अंगठी व मोबाईल असा २ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला. या प्रकरणाचा तपास वाळूज पोलीस करत आहेत.
0 Comments