सोलापूर: रिक्षातून वाहतूक होणारी दोनशे लिटर दारू जप्त

 

सोलापूर 11 फेब्रुवारी (हिं.स) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अ विभागाच्या पथकाने सोलापूर शहरातील न्यू पाच्छा पेठ येथे एका आटोरिक्षातून वाहतूक होणारी दोनशे लिटर हातभट्टी दारु जप्त केली आहे.


तसेच मुळेगाव तांडा व वरळेगाव तांडा येथील हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकून दोनशे लिटर गुळमिश्रित रसायन जप्त केले आहे.


सविस्तर वृत्त असे की, मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पहाटेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरिक्षक अ 2 विभाग उषाकिरण मिसाळ यांना जवान शोएब बेगमपुरे यांचेसह सोलापूर शहरातील न्यू पाच्छा पेठ येथे बजाज कंपनीची तीन चाकी रिक्षा क्र. MH-13- CT -3349 या वाहनातून दोन रबरी ट्यूबमध्ये दोनशे लिटर हातभट्टी दारु साठवून वाहतूक करीत असतांना जप्त केली. 


रिक्षा चालक घटनास्थळावरुन पळून गेल्याने त्यास फरार घोषित करुन त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात रु. 10 हजार दोनशे किंमतीच्या हातभट्टी दारु व वाहनासह एकूण एक लाख दहा हजार दोनशे किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.


Post a Comment

0 Comments