प्रेमाला कुठे वयाचं बंधन कळतंय असं म्हणतात पण जर ते दोन्ही बाजूने सहमतीने असेल तरच.. नाहीतर मग या पठ्ठ्यासारखी चारचौघात मान खाली घालावी लागते
तर झालं असं की, व्हिडिओच्या सुरवातीलाच एक महिला तरुणावर चढ्या आवाजात आरोप लावताना पाहायला मिळत आहे. ती म्हणते, “याच्या वयाची तर माझी मुलं आहेत, निर्लाज्जासारखा अश्लील गोष्टी करतोय” असं म्हणून काकू त्याला बडबडू लागतात. यावर तो तरुण ओके ठीक आहे मला माफ करा, काकू असं म्हणतो. मग काकू ज्या काही भडकून उठतात, आता मला प्रपोज करत होता आणि आता फसल्यावर लगेच मी काकू झाले का असं म्हणत त्या पुन्हा आपल्या शब्दांचा मारा त्या तरुणावर करू लागतात. हा सगळा प्रकार पाहता बाजूला असणारे एक वयस्कर काका सुद्धा पेटून उठतात आणि सरळ त्या तरुणाच्या कानाखाली लगावतात.
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी तरुणाच्या फजितीवर भाष्य केले आहे. म्हणून जरा वय बघून आशिकी करावी. व्हॅलेंटाईन आधी कोणी मिळेना वाटतं अशा कमेंट या व्हिडीओखाली पाहायला मिळत आहेत. काहींनी तर त्या मुलाची बाजू घेत जाऊदे ना नाही म्हणून बाजू व्हायचं असा सल्ला काकूंनाही दिला आहे.
0 Comments