आईनेच घेतला पोटच्या मुलांचा जीव

 

औरंगाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आईनेचं आपल्या दोन लहान मुलांचा जीव घेतला आहे. सादात नगर परिसरात काल दोन सख्ख्या बहिण भावाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.


तपासात पुढे या दोन्ही चिमुकल्यांना त्यांच्या आईनेच मारल्याचं समजलं आहे. 

काल 6 वर्षीय अजिबा बसरावी आणि 4 वर्षीय अलिफहात बसरावी या दोन्ही भावंडांचा झोपेत मृत्यू झाला होता. सकाळी जेव्हा त्यांचे आई बाब उठले तेव्हा त्यांनी मुलांना उठवले मात्र दोन्ही मुलं काहीच प्रतिक्रिया देत नव्हती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.


अचानक दोन्ही भावंडांचा मृत्यू कसा झाला? या बाबात परिसरात एकच चर्चा सुरू होती. अशात या प्रकरणी पोलीस तपासात मोठी माहिती समोर आली असून स्वतःच्या आईने कपड्याने नाक आणि तोंड दाबून त्यांची हत्या केल्याचे समोर आले आहे.


आरोपी आई मनोरुग्ण असल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. सातारा पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेत पुढचा तपास सुरू केला आहे.

Post a Comment

0 Comments