वाशिम : वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर – अकोला महामार्गावरील पार्डी ताड फाट्याजवळ भरधाव ट्रॅक्टरने ऑटोरिक्षाला धडक दिली. या भीषण अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला.
ट्रॅक्टर ऑटोला धडकला
ही घटना ग्रामीण भागातील आहे. ग्रामीण भागात रस्ते अरुंद असतात. अशावेळी दोन वाहन जात असतील, तर वाहन पुढं काढणं कठीण होते. शिवाय समोरून वाहन येण्याची शक्यता कमी असल्याने काही जण भरधाव वाहन चालवतात. ट्रॅक्टरचालक जोराने जात होता. तेवढ्यात ऑटोरिक्षाला धडकला. ही धडक येवढी मोठी होती की, दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर प्रवासी गंभीर जखमी झाले.
अपघात येवढा भीषण होता की, जागीच दोघांचा जीव गेला. इतर जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं. ऑटोने पलटी मारली. यावरून अपघाताची भीषणता समजते. लगेच गावकरी धावले. त्यांनी जखमींना रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.
0 Comments