वेगवेगळया व्यावसायिकांकडून साहित्य घेऊन हॉटेल विकुन दोघांनी घातला ७३ लाखांना गंडा

 

पुणे :  हॉटेलसाठी वेगवेगळ्या व्यावसायिकाकडून उधारीवर त्यांनी साहित्य घेतले. त्यानंतर हॉटेल विकून ते फरार झाले असून व्यावसायिकांची ७३ लाख ६५ हजार ९४६ रुपयांची फसवणूक  केल्याचा प्रकार समोर आला आहे.


याप्रकरण अवधेश उपाध्याय (वय ३९, रा. आनंदनगर, केशवनगर, मुंढवा) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ९८/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शौकत अली खान, रेणुरतन शौकतअली खान (रा. पंचशिल टॉवर, खराडी) यांच्यावर गुन्हा  दाखल केला आहे. हा प्रकार खराडी येथील स्काय हाय व फ्लास हाय हॉटेल येथे २०१६ ते ३० डिसेबर २०२२ दरम्यान घडला. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शौकत अली खान व त्याची पत्नी रेणुरतन खान
यांनी त्यांच्या हॉटेलसाठी फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी दुध व दुधाचे पदार्थ घेतले.


त्यांचे एकूण ३९ लाख रुपये न देता फसवणूक  केली.
तसेच सिमरजित जसबिरसिंह अरोरा यांच्याकडून कोळसा घेऊन त्यांची ६ लाख ८४ हजार ९३५ रुपयांची फसवणूक केली.
अश्विन परदेशी यांच्याकडून ६ लाख ८२ हजार ८०० रुपयांचे मासे घेतले.
विजय शिवले यांच्याकडून १९ लाख २३ हजार ८७२ रुपयांचा भाजीपाला घेतला.
श्रीकांत कापसे यांच्याकडून १ लाख ७४ हजार ११० रुपयांचा किराणा माल घेतला होता. हॉटेल असल्याने ते पैसे देतील,
असे वाटल्याने या व्यावसायिकांनी त्यांना उधार माल दिला होता. मात्र, त्यांनी ३० डिसेबर रोजी अचानक हॉटेल बंद केले.
त्यानंतर ते पसार झाल्याने शेवटी आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर तपास करीत आहेत.


Post a Comment

0 Comments