बाप लेकाला कॉपी पुरवायला गेला, पोलीसांनी अधिकाऱ्यानी पकडले आणि दिला बेदम चोप video तुफान व्हायरल

 

जळगाव : राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहे. त्या दरम्यान कॉपी मुक्त परीक्षा करण्यासाठी बोर्डकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.


त्यामध्ये नुकताच एक व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. एका शाळेत आपल्या विद्यार्थ्याला कॉपी पुरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पालकाला पोलिसांनी चांगलाच चोप दिला आहे. पोलिसांनी चोप दिल्याचा व्हिडिओ व्हायरल  झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस अधिकाऱ्याने पालकाला मारहाण झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. चोपडा तालुक्यातील अडावद गावातील नूतन ज्ञानमंदिर विद्यालय परिसरातील हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे.


खरंतर परीक्षा काळात केंद्रापासून 100 मीटर अंतर हे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. नूतन ज्ञानमंदिर विद्यालयात दहावीची परीक्षा सुरू आहे. पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर होता. त्यालाच आपल्या पाल्याला कॉपी पुरवायला जाणाऱ्या एका पाल्याला पोलिसांनी बेदम चोप दिला आहे.

विशेष म्हणजे पोलिसांनी पकडल्यावर पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाल्याला पोलिसांनी पोलिसांच्या काठीनेच चोप दिला आहे. उपस्थित असलेल्या नागरिकांनी याची चित्रीकरण करून मोठ्या प्रमाणात व्हायरल केला आहे. त्यामुळे सोशल मिडियासह जळगावमध्ये जोरदार चर्चा होत आहे.


सुरुवातीला पोलिसांनी या पालकला हटकले होते. मात्र तरीही कॉपी पुरवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पालक कॉपी घेऊन जात असतांना प्रतिबंधित क्षेत्रात जाताच पोलिसांनी पोलिस काठीने चोप दिला. त्यावेळी पालक जमिनीवर कोसळला होता. हे संपूर्ण व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकारी हा जळगाव पोलिस दलातील असून गणेश बुवा असे त्यांचे नाव आहे. अडावद पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरिक्षक या पदावर ते कार्यरत आहे. याबाबत वरिष्ठ पोलिसांनी कुठलीही भूमिका घेतली नसून याबाबत कुठलीही कारवाई केल्याचे समोर आलेले नाही.

Post a Comment

0 Comments