छत्रपती संभाजीनगर : उस्मानपुरा भागात नागसेन उच्च माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी एका परीक्षार्थी विद्यार्थ्याने गणिताचा पेपर अवघड चालल्यामुळे चक्क उत्तपत्रिका
घेऊनच परीक्षा कक्षातून धूम ठोकली. या घटनेमुळे हवालदिल झालेल्या पर्यवेक्षकाने केंद्र संचालकांमार्फत पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर त्याचा शोध घेऊन त्या विद्यार्थ्याला एका खासगी अभ्यासिकेतून पकडून आणले.
शुक्रवारी बारावीचा गणिताचा पेपर होता. उस्मानपुरा परिसरातील नागसेन उच्च माध्यमिक विद्यालयात १७ क्रमांकाच्या कक्षात पर्यवेक्षकांनी २८ पानांची शिवलेल्या उत्तरपत्रिका सर्व विद्यार्थ्यांना वाटल्या.
त्यानंतर या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेची शिलाई उसवली व त्यातील १३, १४, १५ आणि १६ या क्रमांकाची पाने व प्रश्नपत्रिका बेंचवर ठेवून तो लघुशंकेसाठी म्हणून बाहेर गेला. त्याने शाळेच्या संरक्षक भिंतीवरून उडी घेऊन परीक्षा केंद्रातून पळ काढला.
0 Comments