नवी दिल्ली : आजकाल सोशल मीडिया हा लोकांच्या जीवनातला एक अविभाज्य घटक बनला आहे. लहान मुलांपासून तर वृद्धापर्यंत सर्वच सोशल मीडियाचा वापर करत आहे. प्रसिद्धी झोतात येण्यासाठी लोक तर काहीही करताना दिसून येतात.
सोशल मीडियाच्या या युगात लोक प्रसिद्ध होण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरतात. आजपर्यंत खूप व्हिडीओंनी धुमाकूळ घातला आहे. अशातच यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. सध्या मेट्रोमधील एक व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
व्हिडिओच्या सुरुवातीला एक मुलगी लोकांच्या गर्दीत मेट्रोमध्ये फोन घेऊन रेकॉर्ड करताना दिसत आहे. तिच्या समोर तिची मैत्रिण भर गर्दीत डान्स करत आहे. मुलीचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
मेट्रोचे प्रवासी शांतपणे पाहत आहेत तर काही जण तिथून उठून इकडे तिकडे जाताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांचा मुलींना ट्रोल करत आहे. व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळत आहे. @MajDPSingh या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केल्यानंतर हा व्हिडिओ आतापर्यंत 6 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या डान्स व्हिडिओवर लोकांच्या अनेक कमेंट्सही आल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, "आयुष्यात एवढा आत्मविश्वास हवा आहे" दुसर्या यूजरने लिहिले आहे की, "आणि जेव्हा माझी आई माझ्या खोलीत येते तेव्हा मी लाजून माझा डान्स थांबवतो." तिसऱ्या युजरने लिहिले की, "दिल्ली मेट्रोमध्ये काय चालले आहे, आता फक्त रील बनवल्या जातात."
0 Comments