शेपटीला हात लावताच साप पिसाळला, तरूणाच्या अंगावर उंच उडी मारली अन् पाहा....

 

काही माणसांसाठी साप म्हणजे एकप्रकारे खेळणंच झालं आहे. पण सापांबरोबरचा खेळ कधी जीवघेणा होईल, याचा अंदाज लावता येणार नाही. सापांसोबत मस्ती करुन त्यांचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.


पण हा वेडेपणा काही तरुणांच्या अंगलट आल्याच्या धक्कादायक घटनाही घडल्या आहेत. अशाच प्रकारचा सापाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका तरुणाने सापाची शेपटी पकडून रील बनण्याचा नाद केला. परंतु, पिसाळलेल्या सापाने जेव्हा तरुणाच्या अंगावर उडी मारली तेव्हा मात्र त्याचा अंगावर काटा उभा राहिला. सापाची शेपटी पकडणं या तरुणाला चांगलंच महागात पडल्याचं व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.


सापाचा हा थरारक व्हिडीओ mr_vsg नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला धक्कादायक कॅप्शनही देण्यात आला आहे. ‘मी प्रत्येक दिवस शेवटचा समजून जगतो,’ असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, ‘भावा, प्लिज एवढी रीस्क घेऊ नको.’ तर अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, ‘हा काय वेडेपणा आहे?’. सापाच्या व्हिडीओला हजारो व्यूज मिळाले असून व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.


सर्पदंशाने काही माणसांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सापांसोबत खेळ करणं काही जणांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. विषारी सापांसोबत रील बनवताना काही तरुणांचा दंश झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. असे असतानाही काही तरुण सापांसोबत खेळ करण्याचा नाद सोडत नाहीत. परिणामी त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. सापांपासून दूर राहणू स्वत:च्या जीवाचं रक्षण करण्यासाठी वन विभागाकडून लोकांना नेहमीच सूचना दिल्या जातात. पण काही माणसं जंगलात जाऊन नियमांची पायमल्ली करतात आणि सापाचे शिकार होतात.

Post a Comment

0 Comments