छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार अपघात झाल्याची माहितीसमोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडजवळ हा अपघात झाला आहे.
सिल्लोडजवळ एसटी बस आणि सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 1 ठार तर 15 ते 20 प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान कोणतेही सिलेंडर फुटले नसल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणाऱ्या सिल्लोड येथे भीषण अपघात झाला. दरम्यान सिल्लोडहून पाचोराकडे जाणाऱ्या एसटी बसला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या ट्रकमध्ये गॅस असल्याचे बोलले जात आहे.
अपघातात ट्रकमधील सिलेंडर रस्त्यावर पडले मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने झाला अपघात रस्त्यांवर काचेचा तुकड्यांचा सडा पडला होता. या अपघातात सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक चालक जागीच ठार झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रक चालकाचा मृतदेह क्रेनच्या साह्याने बाहेर काढावा लागला.




0 Comments