Pandharpur Live : उद्या शनिवार दि. 4 मार्च 2023 रोजी डॉ. सोनवणे आयुर्वेद क्लिनिक, वरील मजला, सोनवणे हॉस्पिटल, भोसले चौक पंढरपूर येथे सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत व डॉ.सोनवणे क्लिनिक, स्वप्नील ट्रेलर्स शेजारी, पंढरपूर-पुणे रोड, इसबावी येथे सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत सदर शिबीर संपन्न होणार आहे. अशी माहिती डॉ. सौरभ सोनवणे व डॉ.सौ.श्रुती सोनवणे यांनी दिली आहे.
पंढरपूर येथील कै. आण्णासाहेब सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर यांचे वतीने पंढरपूर व इसबावी येथे नवजात बालकांपासून ते 16 वर्षांपर्यंतच्या मुलां-मुलींसाठी सुवर्णप्राशन संस्कार शिबीराचे आज आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. सौरभ सोनवणे व डॉ. सौ.श्रुती सोनवणे यांनी दिली आहे.
नवजात बालकांपासून ते 16 वर्षाची मुल-मुली वारंवार आजारी पडत असतील,मुलांची शारीरिक वाढ योग्य प्रमाणात होत नसेल मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल तर यावर सोनवणे आयुर्वेदिक व पंचकर्म सेंटर पंढरपूर यांनी “दोन थेंब बाळाला द्या सुवर्णप्राशनाचे, वरदान लाभेल आरोग्य व बौद्धिक विकासाचे” या उद्देशाने बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी हे सुवर्णप्राशन तयार करण्यात आले आहे.




.jpg)
0 Comments