सांगोला : मिरज - सांगोला या राष्ट्रीय महामार्गावरील कमलापूर गावाजवळ अज्ञात पिकअप वाहनाने दुचाकी वाहनास पाठीमागून धडक दिल्याने यात एक मयत आणि एक जखमी झाला. ही घटना आज मंगळवारी (ता .28) सकाळी दहाच्या सुमारास घडली.
भीमराव लक्ष्मण करपे असे मयताचे तर शंकर मच्छिंद्र चौगुले असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील भीमराव लक्ष्मण करपे हा मंगळवेढा येथील नातेवाईक शंकर मच्छिंद्र चौगुले यांच्या मालकीच्या मोटारसायकलवरून कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील बिरोबा यात्रेला गेले होते.
तेथून आज मंगळवारी सकाळी परत आपल्या गावी येत असता मिरज - सांगोला या राष्ट्रीय महामार्गावरील कमलापूर या ठिकाणी सकाळी दहाच्या सुमारास अज्ञात पिक अप वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने भीमराव करपे हा जागीच मयत झाला.
याबाबत दादासाहेब लक्ष्मण करपे यांनी सांगोला पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात वाहन चालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहेत.
0 Comments