विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या एका शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यात घडली आहे.
सलगर (ब्रु) ता.मंगळवेढा येथील विनोद चन्नप्पा तेली (वय 14) असे मयत झालेल्या मुलाचे नाव असून ही घटना आज दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
घटनेची खबर मयत मुलाचे वडील चन्नप्पा तेली यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आज दि.4 एप्रिल रोजी 1.30 वा.चे पुर्वी फिर्यादीचा मयत लहान मुलगा विनोद चन्नप्पा तेली वय 14 (इ.06 वी) रा.सलगर (ब) ता. मंगळवेढा
हा गावातील नामदेव आप्पासो पवार यांच्या शेतातील विहीरीत सलगर (ब्रु) येथे पोहण्यासाठी गेला असता तो तेथेच पोहताना बुडुन मयत झाला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेचा अधिक तपास मंगळवेढा पोलीस करीत आहेत.
0 Comments