पंढरपूर सिंहगड मध्ये "सेन्सर आणि अँप्लिकेशन" या विषयावर व्याख्यान संपन्न

पंढरपूर: प्रतिनिधी

   एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग व इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअर्स (आई.ई.टी.ई)  यांच्या संयुक्त विद्यमाने सेन्सर आणि अँप्लिकेशन “ या विषयावर दिनांक ४ एप्रिल २०२३  रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.


 हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न  झाले असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली. 


           या प्रोग्रॅम अंतर्गत तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या ७० हुन अधिक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. या प्रोग्राम मध्ये त्यांना सेन्सर, रासबेरीपाई या कंपोनेन्ट याची माहिती देण्यात आली

. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा. वैभव गोडसे, अमित करांडे, विदयार्थी प्रतिनिधी म्हणून रोहन चौगुले, प्रतीक्षा भुजबळ, विनायक ऐवळे यांनी परीश्रम घेतले.


 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments