सोलापूर :गेल्या तीन वर्षापासून द्राक्षाला दर नसल्याने, तसेच चालु वर्षी बाग फेल गेल्याने बाग लागवडीसाठी घेतलेले खाजगी व विविध बँकांचे कर्ज कशाने फेडावयाचे या धास्तीने एका पस्तीस वर्षीय शेतकऱ्याने त्याच्याच शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
सचिन अशोक खांडेकर वय 35 रा मनगोळी ता मोहोळ असे गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, सचिन खांडेकर यांनी तीन वर्षांपूर्वी द्राक्ष बाग लागवड केली आहे. बागेची लागवड करताना खर्चासाठी त्यांनी खाजगी व विविध बँकांचे कर्ज घेतले होते.
मात्र, गेल्या दोन वर्षापासून द्राक्षाला दर नसल्याने तसेच बाग फेल गेल्याने बँकाच्या कर्जाचे हप्ते वेळेत न गेल्याने सचिन हा निराश होता. तो एकटाच कोणाला काहीही न बोलता बसून राहायचा. तसेच चालू वर्षी अवकाळी पाऊस पडल्याने व पिकाचे नुकसान झाल्याने तो जास्तच निराश होता.
0 Comments