विचित्र अपघातात डोळ्यासमोर पोटच्या लेकरांचा मृत्यू, आई - वडीलही जखमी

 

नाशिक : जिल्ह्यातील वणी पिंपळगाव रोडवर एका विचित्र अपघात झाला. या अपघातात दोन ठार तर तीन जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी रात्री एक वाजेच्या सुमारास घडली आहे.


पिकअप आणि दुचाकीच्या या अपघातात बहिण भावांचा करूण अंत झाला. आपल्या आई-वडिलांसमोरच त्यांच्यापासून या भावंडांना हिरावून घेतले आहे. या दुर्दैवी अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पिकप वाहन क्रमांक ( एम. एच. 16 डिके 7737) आणि पॅशन प्रो दुचाकी क्रमांक ( एम. एच. 15 एचडी 3034) यांच्यात अपघात झाला.


दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील आणि बाजूला उभे असलेले इसम ही जखमी झाले. दरम्यान या अपघातात ओझर येथील 15 वर्षीय साहिल सुनील शिरसाट आणि 12 वर्षीय स्नेहल सुनील शिरसाठ हे दोघे बहिण भाऊ अपघातात ठार झाले आहेत. त्यांचे आई वडील सुनील बापू शिरसाट ( वय 40 ) आणि सोनाली सुनील शिरसाट ( वय 35 ) हे जखमी झाले. याशिवाय रमणाबाई अप्पा खवळे ( वय 50 ) ही महिला देखील अपघातात जखमी झाली आहे.

अपघातानंतर जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करिता दाखल करण्यात आले आहे. 


तर या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या मृतांचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या अपघाताप्रकरणी गोकुळ रामहरी शेळके ( वय 30 ) राहणार बोराळे तालुका चांदवड, नाशिक यसा वणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.


Post a Comment

0 Comments