मुंबई : 'पाण्यात राहून मगरीशी शत्रुत्व करू नये' अशी एक म्हण प्रचलित आहे. पण असे काही लोक आहेत जे पायावर कुऱ्हाड मारत नाहीत, तर कुऱ्हाडीवर लाथ मारतात.
सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्हाला असंच काहीसं पाहायला मिळेल. यामध्ये एक व्यक्ती महाकाय मगरीची शिकार होण्यापासून थोडक्यात वाचतो. हा व्हिडिओ पाहून काही युजर्स विचारत आहेत की, ही व्यक्ती तिथे कशी पोहोचली? तर काहींचा अक्षरशः थरकाप उडाला.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण नदीच्या काठावर मोठ्या झुडपांजवळ उभा आहे. तिथेच त्याच्या समोर एक महाकाय मगर आहे. पाण्याच्या राक्षसाच्या ताव़डीतून वाचण्यासाठी तो तरुण आपलं शरीर पूर्णपणे मागे घेत असल्याचं आपण पाहू शकता. मात्र, झुडपं असल्याने त्याला तिथून बाहेर पडता आलं नाही.
आता मगर या व्यक्तीला जिवंत सोडणार नाही, असं तुम्हाला वाटेल. मात्र, त्यानंतर तरुणाचं नशीब चमकलं आणि तो थोडक्यात बचावला.
ऐनवेळी ही मगर हल्ला न करता मागे सरकली आणि पाण्यात निघून गेली. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @earth.reel नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
वापरकर्त्याने कॅप्शन दिलं की, जर तुम्ही या परिस्थितीत असाल तर तुम्ही काय कराल? दोन दिवसांपूर्वी अपलोड केलेल्या व्हिडिओला शेकडो लाईक्स मिळाले आहेत, तर नेटिझन्स ही क्लिप पाहून घाबरले आहेत. एका यूजरने कमेंट करताना लिहिलं आहे की, अशा परिस्थितीत मी काय केलं असतं. मगरीच्या समोर उभा असताना कोणी इतका विचार करू शकतो का? तर दुसरा युजर म्हणतो, भावाने काही काळ यमराजाला पाहिलं असेल. आणखी एका युजरने विचारलं की, ही व्यक्ती तिथे कशी पोहोचली हे समजत नाही. इतरही अनेकांनी व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत
0 Comments